ज्यांना उत्तम पत्रकार व्हायचे आहे अथवा ज्यांना पत्रकार कसे काम करतात हे जाणून घ्यायचे आहे अशा व्यक्तींसाठी हा पत्रकारिता अभ्यासक्रम आमरास (अभय मोकाशी’स अकॅडेमी फॉर मास मीडिया रिसर्च अँड स्टडीज)तर्फे तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम गांभीर्याने पत्रकारिता करणाऱ्यांसाठी आहे आणि पत्रकार समाजात कशी महत्वाची भूमिका बजावू शकतात हे या अभ्यासक्रमातून शिकवण्यात येईल.
ज्यांना दुरचित्रवाणीवरून गोंगाट करायचा आहे किंवा देशातील वास्तविक परिस्थितीपासून दर्शकांचे / वाचकांचे लक्ष भिन्न दिशेला वळवायचे आहे, अशांसाठी हा अभ्यासक्रम नाही.
या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वृत्तपत्राच्या संपादकीय आणि वृत्त विभागात कसे काम केले जाते याची नियमितपणे संधी दिली जाईल, ज्यामुळे बातमी कशी हाताळावी, क्षणात निर्णय कसे घ्यावे याचा अनुभव मिळेल. यांचा उपयोग विविध प्रकारच्या पत्रकारितेत होईल.
कोर्सची प्रमुख उद्दीष्टे:
– हा पत्रकारितेचा अभ्यासक्रम होतकरू पत्रकारांसाठी उपयुक्त ठरेल कोर्स विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या विविध बाबींशी परिचित करेल आणि त्यांना पत्रकार होण्यासाठी तयार करेल.
– हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उत्तम पत्रकार आणि चांगले संवादक होण्यास मदत करेल. यात देशातील विकासासंदर्भातील विविध विषय दिले जातील, ज्यामुळे त्यांना समाज आणि पीडित लोकांच्या उन्नतीसाठी काम करण्यास उपयोगी ठरेल.
– कोर्स विद्यार्थ्यांना न्यूजरूम निर्णय आणि आवृत्त्यांच्या नियोजनाची ओळख करून देईल. विद्यार्थ्यांना प्रकाशने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना असे करण्याच्या संधी मिळतील.
– रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या मूलभूत गोष्टींची माहिती दिली जाईल, विद्यार्थी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रेडिओ आणि टेलिव्हिजन प्रोग्राम तयार करतील.
रोजगाराच्या संधी:
या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना समाजातील विविध विषयांना धरून पत्रकारिता करता येईल.
अभ्यासक्रमाची रचना:
या कोर्समध्ये २८ क्रेडिटसह १४० सत्रामध्ये ११ मॉड्यूल आहेत. त्याचबरोबर चर्चासत्र आणि कार्यशाळा आहेत. २८ क्रेडिटसह १४० सत्रांची यशस्वी पूर्तता करणारे विद्यार्थी डिप्लोमासाठी पात्र होतील. हा अभ्यासक्रम दोन सेमीस्टरमध्ये पूर्ण केला जाईल. अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा किंवा अभ्यासकांचे हित लक्षात घेऊन काही सत्र एकत्र करण्याचा अधिकार संस्थेकडे आहे.
अध्यापन पद्धत:
अँड्रोगॉजीचे (प्रौढांना शिकवण्याची पद्धत)अनुसरण केले जाईल, ज्यात व्याख्याने, गट चर्चा, चर्चासत्रे, प्रकरण अभ्यास, शिफारस केलेल्या / सुचविलेल्या क्षेत्रांना भेटी आणि संशोधन यांचा समावेश असेल. सर्व सत्रे ऑनलाइन असतील. सर्व सत्र इंग्रजी भाषेतून होतील, मात्र लिखाण आणि वृत्त संपादन या विषयाची काही खास सत्र मराठीतून होतील.
मूल्यांकन:
विद्यार्थ्यांना कोर्स सामग्री आणि शिकण्याच्या निकालांवर आधारित गृहपाठ दिला जाईल.विद्यार्थी हा गृहपाठ मराठीतून पूर्ण कारु शकतात.